गांधीनगर (गुजरात) -गाधीनगर येथील वरदायिनी मंदिर ( Vardayini mata decorated with dollars ) प्रकाशझोतात आले आहे. या देवीला डॉलरची आरास करण्यात आली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका भक्ताने बुधवारी मंदिराला डॉलर दान केले होते. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी आणि कार्यवाहकांनी देवी वरदायिनीला डॉलरने सजवले. देवीला केलेली ही आरास सध्या चर्चेचा विषय ठरली असून, ती नागरिकांचे लक्ष वेधत आहे.
हेही वाचा -Manmohan Singh : 'कमी बोललो, काम जास्त केले'; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल
दागिन्यांसह डॉलरने मातेच्या मूर्तीचे सुशोभिकरण
माघी पूर्णिमेच्या दिवशी (बुधवारी) वरदायिनी मातेला दागिन्यांनी सुशोभित करण्यात आले. त्याचबरोबर, मातेच्या मूर्तीला 1 हजार 500 डॉलरनी सजवण्यात आले. डॉलर दान करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. मात्र, या मंदिराला येणाऱ्या दानचा 50 टक्के भाग हा विकास कार्यात खर्च केला जातो.