महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये चॉकलेटची वाहतूक - वास्को द गामा रेल्वे स्टेशन

हब्बली दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने शुक्रवारी एक नवीनच प्रयत्न केला आहे. रेल्वेत एसी कोचचा वापर चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला आहे. यामध्ये ज्या चॉकलेटला थंड हवा आणि नियंत्रित तापमानाची आवश्यक असते त्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये (8 ऑक्टोबर)रोजी सुमारे 163 टन वजनाचे चॉकलेट आणि नूडल्स गोव्यातील वास्को द गामा ते ओखला (दिल्ली)पर्यंत जाणाऱ्या ट्रेनमध्ये भरले होते.

पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये चॉकलेटची वाहतूक
पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये चॉकलेटची वाहतूक

By

Published : Oct 10, 2021, 9:16 AM IST

Updated : Oct 10, 2021, 10:34 AM IST

हब्बली (कर्नाटक) -दक्षिण पश्चिम रेल्वे, हब्बली विभागाने शुक्रवारी एक नवीनच प्रयत्न केला आहे. रेल्वेत एसी कोचचा वापर चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला आहे. यामध्ये ज्या चॉकलेटला थंड हवा आणि नियंत्रित तापमानाची आवश्यक असते त्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये (8 ऑक्टोबर)रोजी सुमारे 163 टन वजनाचे चॉकलेट आणि नूडल्स गोव्यातील वास्को द गामा ते ओखला (दिल्ली)पर्यंत जाणाऱ्या ट्रेनमध्ये भरले होते. यातील 18 वातानुकूलित डब्यांमध्ये हे चॉकलेट आणि नूडल्स भरण्यात आले होते.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी अभिनंदन केले

ही एसी पार्सल एक्स्प्रेस ट्रेन 2115 किलोमीटरचे अंतर पार करून शनिवारी दिल्लीला पोहोचत असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली होती. हब्बली विभागाच्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू)च्या प्रयत्नांमुळे, वाहतुकीचा हा नवीन प्रयोग रेल्वेकडून करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बीडीयूच्या या प्रयत्नांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, रेल्वेची ही सेवा जलद, आरामदायी आणि किफायतशीर स्वरूपाची आहे. या रेल्वे सेवांचा लोकांनी वापर करावा यासाठी रेल्वे ग्राहकांपर्यंत निश्चितपणे पोहचण्याचे काम करत आहे असही ते म्हणाले आहेत.

चालू आर्थिक वर्षात विभागाची पार्सल कमाई 11.17 कोटी रुपये इतकी झाली

या नवीन प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, उद्योग आणि व्यापाऱ्यांकडूनही कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर आता रेल्वेच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. (ऑक्टोबर 2020)पासून हुब्बली रेल्वे विभागाची मासिक पार्सल कमाईने 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (सप्टेंबर 2021)ला हुब्बली विभागाची पार्सल कमाई 1.58 कोटी रुपये झाली आहे. तर, सप्टेंबर 2021 पर्यंत चालू आर्थिक वर्षात विभागाची पार्सल कमाई 11.17 कोटी रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती विभागाने दिली आहे.

हेही वाचा -जगातील सर्वात मोठी "रामोजी फिल्म सिटी" पर्यटकांनी फुलली

Last Updated : Oct 10, 2021, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details