महत्त्वाच्याठळक घडामोडी:
आज राज्यात पावसाचा अंदाज -महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली (Rain forecast today) आहे. महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काल मान्सून उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागातून माघारी परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून आणखी काही भागातून माघारी फिरेल.
अंधेरी पूर्व निवडणुकीचा प्रचार आजपासून सुरू -शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांच्या निवासस्थानापासून होणार आहे. तर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचाराची सुरुवात होणार (Andheri East by Election) आहे.
आज ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग पूजेसंबंधी याचिकेवर सुनावणी- आज वाराणसी कोर्टात वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाच्या नियमित पूजेसाठी दाखल याचिकेवर सुनावणी होणार (Hearing on Shivling worship in Gyanavapi Masjid today)आहे.
शिवसेनेच्या विरोधात समता पक्ष आज न्यायालयात -आज शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात समता पक्ष कोर्टात जाणार (Samata Party against Shiv Sena in court today) - आहे. मशाल चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना देऊ नये अशी समता पक्षाची मागणी आहे. ते आज दिल्ली हायकोर्टात आपलं म्हणणं मांडणार आहे.
प्राध्यापक साईबाबा यांच्या याचिकेवर आज सुनावणी -आज सुप्रीम कोर्टात प्राध्यापक साईबाबा यांच्या सुटकेविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी होणार (Hearing on Professor Saibaba petition today) आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जी. एन साईबाबाची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य सरकारने दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे.