महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा ; आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी - Hearing on Rituja Latke plea today

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (News stories of national and local importance )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Oct 13, 2022, 7:53 AM IST

'या' भागात आज पावसाचा 'यलो अलर्ट' (Maharashtra Rain Today Update) - परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. आज हवामान विभागानं राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींचा आज उना आणि चंबा दौरा ( PM Narendra Modi Today visit Una and Chamba ) - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उना आणि चंबा दौऱ्यावर आहेत. ते आज अडीच तास उनामध्ये असणार आहेत.

कर्नाटक हिजाब प्रकरणी आज निकालाची अपेक्षा ( Karnataka Hijab Case ) - कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुप्रिम कोर्टात निकाल येणार आहे. हिजाब प्रकरणाचा निकाल आता सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण होऊन आज या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.

आज अमित ठाकरेंचा जालना दौरा (Amit Thackeray today Jalna visit) - आज मनसे नेते अमित ठाकरे जिल्हा जालना दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. अमित ठाकरे आज दुपारी 3 वाजता सिडस कंपनी महिको कार्यालयाला भेट देणार आहेत .

प्रकाश आंबेडकरांचा अकोला दौऱ्याचा आज दुसरा दिवस ( Prakash Ambedkar Akola visit Today) - वंचित बहुजन आगाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या अकोला दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अकोला जिल्हा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर आज सुनावणी (Hearing on Rituja Latke plea today ) - दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंनी पालिके विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

छगन भुजबळांचा ७५ वा वाढदिवस (Chhagan Bhujbal birthday) - राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. हा सोहळा मुंबईतील (Mumbai) माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. छगन भुजबळ यांची जन्मतिथी १५ ऑक्टोबर आहे, परंतु 13 ऑक्टोबरला ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details