- पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद..
पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ही व्हर्चुअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.
- महाविकास आघाडीची 'डॅमेज कंट्रोल' बैठक..
महाविकास आघाडीची 'डॅमेज कंट्रोल' बैठक..
मनसुख हिरेन यांचा मृत्यु आणि सचिन वाझेंच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. तर राज्य सरकारकडून सावध पवित्रा घेतला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास 'सह्याद्री' बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
- मिहीर कोटेचा यांची पत्रकार परिषद..
मिहीर कोटेचा यांची पत्रकार परिषद..
सचिन वाझे प्रकरणी भाजपा शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. याप्रकरणी भाजपा आमदार मिहिर कोटेचा आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी काही शिवसेना नेत्यांवर थेट आरोप केला जाण्याची शक्यता आहे.
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक..
राज्य मंत्रिमंडळाची बैठक..
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील कोरोना प्रश्न, वीज बिल प्रश्न आणि वाझे प्रकरण याबाबत चर्चा केली जाऊ शकते.
- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी..
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी..
कथित टीआरपी घोटाळ्याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
- हाथरस प्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी..
हाथरस प्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी..
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी मंगळवारी नियोजित करण्यात आली होती. मात्र, पीडितेचा भाऊ सुनावणीस उपस्थित राहू शकला नसल्याने आज ही सुनावणी पार पडेल.
- भोपाळ, इंदूरमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी..
भोपाळ, इंदूरमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी..
मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि इंदूर शहरांमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- गुजरातच्या चार शहरांमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू..
गुजरातच्या चार शहरांमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू..
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा या शहरांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.