- आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार
जागतिक दर्जाच्या व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मुंबईमध्ये असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
- सुशांतचा मित्र ऋषिकेश पवारला अटक; एनसीबी आज न्यायालयापुढे करणार सादर
एनसीबीने सुशांतसिंग राजपूतचा मित्र आणि दिगर्दर्शक ऋषिकेश पवार याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाची लढाई या मुद्यासह, अर्थसंकल्प या संदर्भात महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नाशिक दौऱ्यावर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सटाणा, सुरगाणा व नाशिक शहरात कार्यक्रम घेणार आहेत. सटाणा मध्ये देव मामलेदार यशवंत महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचा समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत होणार आहे.
- गोकूळ दूधची आज सर्वसाधारण सभा
आज कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळ दूध संघाची 58 वी सर्वसाधारण सभा होणार आहे.
- हरियाणाच्या जिंदमध्ये आज 'महापंचायत'; राकेश टिकैत राहणार उपस्थित
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या जिंदमध्ये आज महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतील भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकैतही या महापंचायतीला हजर राहणार आहेत.
- नाशिक जिल्ह्यात महिला सरपंच पदाचे आरक्षण आज होणार जाहीर
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.
- भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आज केरळामध्ये
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज केरळ दौऱ्यावर आहेत. ते तेथील एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे