महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ilker Ayci as MD of Air India : टाटा सन्सचा मोठा निर्णय; इल्कर आयसी यांची एअर इंडियाच्या चेअरमन पदी निवड - टाटा सन्स संचालक मंडळ बैठक

सोमवारी एअर इंडियाच्या संचालक मंडळाची ( Air India board meeting ) बैठक झाली. ही बैठक टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन ( Tata Sons Chairman N Chandrasekaran ) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने इल्कर आयसी यांच्या नियुक्ती मंजुरी दिली आहे.

इल्कर आयसी
इल्कर आयसी

By

Published : Feb 14, 2022, 5:56 PM IST

मुंबई- एअर इंडियाची मालकी घेतल्यानंतर टाटा सन्सने मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. टाटा सन्सने आज एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी पदी ( MD of Air India ) इल्कर आयसी ( Ilker Ayci appointment ) यांची नियुक्ती केली आहे.

सोमवारी एअर इंडियाच्या संचालक मंडळाची ( Air India board meeting ) बैठक झाली. ही बैठक टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन ( Tata Sons Chairman N Chandrasekaran ) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने इल्कर आयसी यांच्या नियुक्ती मंजुरी दिली आहे. नियामक संस्थेच्या परवानगीनंतर ही नियुक्ती होणार आहे. इल्कर आयसी हे तुर्कीश एअरलाईनचे चेअरमन ( former chairman of Turkish Airlines ) होते.

हेही वाचा-Rahul Bajaj Passes Away : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या कारकीर्दीत एअर इंडियाचे झाले होते खासगीकरण-

केंद्र सरकारने 69 वर्षानंतर एअर इंडिया ही टाटाकडे सुपूर्द केली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. टाटा ग्रुपचे चेअरमन जे. आर. डी. टाटा यांनी एअर इंडियाची 1932 मध्ये स्थापना केली होती. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले.

हेही वाचा-SUV Jeep Meridian : भारतात नवीन एसयूव्ही 'जीप मेरिडियन' होणार लॉन्च

एन. चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या प्रवासाची सांगितली आठवण

टाटा सन्सचे चेअरमन यांनी ( N Chandrasekharan letter to Air India Employees ) पत्रात म्हटले, की 8 ऑक्टोबर 2021 रोजी एअर इंडियाची घोषणा केल्यापासून प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द आहे. एअर इंडिया स्वगृही परतत आहे. आता नवीन धड्याची सुरुवात आहे. टाटा ग्रुपच्यावतीने मी पत्र लिहित आहे. तुमचे कुटुंबात स्वागत आहे. डिसेंबर 1986 मध्ये एअर इंडियामधून पहिल्यांदा प्रवास केल्याची त्यांनी आठवण सांगितली. तेव्हा किती खास वाटले याची आठवण विसरू शकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details