जम्मू : जम्मू आणि काश्मीरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील बडियारा आणि कानबाठी गावांदरम्यान बांदीपोरा-सोपोर रस्त्यावर आयईडी ( IED detected on Bandipora Sopore road ) आढळून आला. बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून खबरदारी म्हणून रस्त्यावरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे, याप्रकरणी अधिक माहिती घेतला जात आहे.
दहशतवाद्यांचा कट उधळला - सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा संभाव्य स्फोटाचा डाव हाणून पाडला. गुरूवारी ( 13 ऑक्टोबर ) जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जंगलात एका बॅगेत ठेवलेली तीन IED स्फोटके जप्त केली. स्फोटकांव्यतिरिक्त तीन पुलांची छायाचित्रेही बॅगमध्ये सापडली आहेत, ज्यावरून असे दिसते की हे पूल बॅग सोडून गेलेल्या दहशतवाद्यांचे लक्ष्य होते, असे अधिकाऱयांनी सांगितले.
कारवाईत जप्त झालेले साहित्य - अधिकाऱयांनी जप्त झालेल्या साहित्याबाबत माहिती दिली की, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध पथकाने बुधवारी रात्री उशिरा गुल उपविभागातील सांगलदनच्या बशारा-धरम जंगलातून ही बॅग जप्त केली. स्फोटकांची सहा पाकिटे, 49 काडतुसे, प्रत्येकी एक सेफ्टी फ्यूज, बॅटरी आणि डिटोनेटर आणि 20 मीटर लांब पॉवर कॉर्ड जप्त करण्यात आली. यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये तीन आयईडी आणि चिकट बॉम्ब सापडले होते.
जम्मू भागात हल्ला करण्यासाठी प्रयत्न - जम्मू प्रदेशाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले आहे की, जैश-ए-मोहम्मद (जेएम) च्या एका दहशतवाद्याला 2 ऑक्टोबर रोजी कठुआ येथून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलावर गावातील दहशतवादी झाकीर हुसेन भट उर्फ उमर फारूख हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या विविध सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून संपर्कात होता आणि त्याने जम्मू भागात हल्ला करण्यासाठी आयईडी आणि चिकट (पेस्ट)चा वापर केला होता यामध्ये बॉम्ब सापडले.