महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित - aircraft crashes

वायुदलाचे मिराज विमान भरौलीजवळील बाबडी गावात कोसळल्याची घटना घडली आहे. जखमी वैमानिकाला विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. भारतीय हवाई दलानेही ट्विट करून या अपघाताची माहिती दिली आहे.

IAF trainer aircraft crashes in Madhya Pradesh, pilot injured
मध्य प्रदेश

By

Published : Oct 21, 2021, 12:51 PM IST

भोपाळ - भारतीय हवाई दलाचे एक विमान मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात कोसळले. प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे. भिंडचे एसपी मनोज कुमार सिंह यांनी ही माहिती दिली. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वायुदलाचे मिराज विमान भरौलीजवळील बाबडी गावात कोसळले. पोलीस-प्रशासन घटनास्थळी असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमी वैमानिकाला विमानातून बाहेर काढण्यात आले. हे विमान प्रशिक्षणार्थी वैमानिक उडवत होते आणि भिंडपासून सहा किमी अंतरावर असलेल्या बाबडी गावातील एका शेतात विमान कोसळले.

विमान उडवणारे फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष सुखरूप आहेत. भारतीय हवाई दलानेही ट्विट करून या अपघाताची माहिती दिली आहे. आयएएफच्या मिराज 2000 विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. विमान शेताक कोसळले असून, अपघातात पायलट सुखरूप आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,"अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये भींडच्या गोहाडमध्येही हवाई दलाचे विमान कोसळले होते.

हेही वाचा -भारताने पार केला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा, 9 महिन्यातच कामगिरी साध्य

ABOUT THE AUTHOR

...view details