मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यासंदर्भात बोलताना राऊत यांनी 'आता खूप झाल. आता डोक्यावरून पाणी जातय. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उत्तर देणार. (Sanjay Raut criticizes BJP) आता भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील.' अशी सडेतोड प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत ?
'उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असेलच पण सोबतच पक्षाचे इतर पदाधिकारी सर्व आमदार, खासदार देखील असतील. आम्ही सर्व एकत्र ही पत्रकार परिषद घेणार आहोत. (Press conference at Shiv Sena Bhavan) आमच्या पक्षावर मुख्यमंत्र्यांवर आणि संपूर्ण ठाकरे परिवारावर चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उद्या सडेतोड उत्तर देऊ.'
आता खूप झाल
'यांचं आता खूप झाल. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल अनिल देशमुखांच्या बाजूच्या तुरुंगात हा मंत्री जाईल तो मंत्री जाईल. आता डोक्यावरुन मोठ पाणी गेल. आम्ही खूप सहन केल आता बघाच काय होईल.
भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात
'आम्ही यांच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्हाला सांगतो आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री नाही तर भाजपच्या नेत्यांपैकी साडेतीन लोक देशमुखांच्या तुरुंगात असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. आय रिपीट बस झाल आता राजकीय मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे. आता तुम्हाला कळेल आम्ही काय करू ते असा दमही त्यांनी दिला आहे. शेवटी हमाम मे सब नंगे होते है. नींद उड गई है उनकी, जो करना है उखाड लिजिए, मै डरनेवाला नहीं हूं." दरम्यान, राऊत यांच्या या विधानामुळे आता भाजपचे कोण साडेतीन लोक तुरुंगात जाणार त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा -माजी केंद्रीय शिक्षण मंत्री माजी मुख्यमंत्री, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी डेहराडूनमध्ये मतदान केले