सोमनाथ (गुजरात) :गुजरातच्या सोमनाथमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 ची रंगत पाहायला मिळाली आहे. या दरम्यान ओडिशातील एका पतंगबाजाने आय लव्ह मोदी नावाचा पतंग आकाशात उडवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आय लव्ह मोदी पतंग : सोमनाथ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात ओडिशातील एका पतंगबाजाने मोदींच्या नावाचा पतंग बनवून आकाशात उडवला. हा पतंग उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या आधी याने आय लव्ह गुजरात आणि जय द्वारकाधीशचे पतंगही उडवले होते. मात्र आज त्याने सोमनाथमध्ये आय लव्ह मोदी पतंग उडवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पतंग महोत्सवात 15 देशांतील पतंगपटूंचा सहभाग :काल सोमनाथ येथे देश-विदेशातील पतंगबाजांच्या उपस्थितीत पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात भारतासह 15 देशांतील पतंगपटूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. या पतंग महोत्सवात भारतासह या देशांतील पतंगबाज त्यांच्या पारंपरिक पतंगांसह सहभागी झाले आहेत. या पतंग महोत्सवात विविध देशांच्या पतंग कलांचेही प्रदर्शन करण्यात आले.
दोन महिन्यांपासून करत होता तयारी : यावेळी हे पतंग बनवणारा तरुण म्हणाला, 'मोदींकडे आकर्षित झाल्यानंतर मी हा पतंग बनविला आहे. आय लव्ह मोदी पतंग बनवण्यासाठी मी दोन महिन्यांपासून तयारी करत होतो. पतंग महोत्सवासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपासून प्रेरणा घेत मी हा पतंग बनवला आहे'. ओडिशातील मोदींच्या या चाहत्याने दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर जपान, चीनसह इतर देशांतील साहित्य घेऊन हा पतंग बनविला आहे.
गुजरातमध्ये परदेशी पर्यटकांची रेलचेल : यंदा वडोदरा, वडनगर, सोमनाथ, राजकोट, धोलेरा आणि घोर्डोसह अहमदाबादमध्ये पतंग महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामुळे गुजरातमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. रिव्हरफ्रंटवर होणाऱ्या पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल्स उभारून अनेक छोट्या व्यापाऱ्यांनाही आपले उत्पन्न व रोजगार मिळून त्यांचा व्यवसाय व रोजगार वाढतो.
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव : अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 शहरातील साबरमती रिव्हरफ्रंट येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात 68 देशांतील 126 पतंग उडवणारे आणि भारतातील 14 राज्यांतील 65 पतंग उडवणारे सहभागी झाले होते.
हेही वाचा :International Kite Festival 2023 : अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन, पाहा Photos