केरळ - केरळमधून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. येथील पलक्कड जिल्ह्यात पतीनेच पत्नीची हत्या केली. कारण तच सर्वांनाच आश्यर्यचकित करणारे आहे. ( Husband hacks wife to death ) पत्नीने आपल्या पतीला तिच्या दीड वर्षाच्या मुलाला ब्रश न करता चुंबन घेण्यापासून रोखले. त्याचा राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. परंतु, उपचारादरम्यान, तीचा मृत्यू झाला. पलक्कड जिल्ह्यातील काराकुर्सी येथील ही घटना आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ही घटना घडली जेव्हा पती अविनाशला पत्नी दीपिकाने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाचे ब्रश न करता चुंबन घेण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि अविनाशने रागाच्या भरात दीपिकावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे पत्नीच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली.