पाटणा -आदर्श पती-पत्नी आणि त्यांच्या प्रेमाची अनेक प्रकरणे आपण वाचली असतील. मात्र बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न तीच्या प्रियकराशी लावून दिलं आहे. ही घटना बिहारच्या छपरामध्ये घडली.
छपरामधील रोजा मोहल्लामध्ये एका जोडप्याने प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण होत होता. तो तीला मारहाण करायचा. यातच तरुणीला दुसऱ्या पुरुषाचा आधार मिळाला आणि तीला त्याच्यावर प्रेम झाले. आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषावर प्रेम झालं हे कळताच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा पत्नीने व्यक्त केली. सुरवातीला पतीने नकार दिला. मात्र, नंतर स्व:ताला सावरत त्याने पत्नीचे प्रियकरासोबत लग्न लावून दिले.