महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra in Kerala : केरळमध्ये काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला दुसऱ्या दिवशी तुफान गर्दी

काँग्रेसची भारत जोडो यात्रा यशस्वी होताना दिसत आहे. केरळमधील या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी राहुल गांधींच्या पदयात्रेत मोठी गर्दी पाहायला ( Bharat Jodo Yatra in Kerala ) मिळाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी वेल्लयानी जंक्शन येथून आपल्या यात्रेला सुरुवात केली आणि ती कझाकुट्टम येथे (second day of Congress Bharat Jodo Yatra) संपेल.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

By

Published : Sep 12, 2022, 11:12 AM IST

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी यात्रेत लोकांनी मोठी गर्दी केली होती. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी वेल्लयानी जंक्शन येथून पदयात्रेला सुरुवात ( Bharat Jodo Yatra in Kerala ) केली. राहुल गांधींसोबत मोठ्या संख्येने लोक या पदयात्रेत सहभागी झाले होते. तर राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फाही लोकांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी, रविवारी, पहिल्या दिवसाच्या नेमोम भेटीच्या शेवटी, राहुल गांधी म्हणाले की केरळ सर्वांचा आदर करते आणि कधीही स्वतःमध्ये फूट पडू देत नाही आणि द्वेष पसरवू देत ( Bharat Jodo Yatra of rahul gandhi ) नाही.

भारत जोडो यात्रा विचारांचा विस्तारभारत जोडो यात्रा, हा एक प्रकारे याच विचारांचा विस्तार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, केरळच्या लोकांनी एकजूट राहणे आणि सामंजस्याने काम करणे स्वाभाविक आणि सामान्य आहे, त्यांनी हे देशाला दाखवून दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, केरळ येथे येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करतो. राज्यात काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आणि जसजसा दिवस सरत गेला तसतशी लोकांची गर्दी ( second day of Congress Bharat Jodo Yatra ) झाली.

भारत जोडो यात्रा शनिवारी केरळमध्ये पोहोचलीराहुल गांधी हे वायनाडचे खासदार ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) आहेत. त्याशिवाय राज्यात पक्षाचा पाया खूप मजबूत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. काँग्रेस पक्षाने शेअर केलेल्या कार्यक्रमानुसार, सोमवारी ही पदयात्रा पट्टम येथे सकाळी 11 वाजता थांबेल, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता काझाकुटोमला रवाना होईल आणि तिथे पोहोचून दुसऱ्या दिवसाचा प्रवास संपेल. मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडी यात्रा शनिवारी केरळमध्ये पोहोचली. ही यात्रा १९ दिवसांत राज्यातील सात जिल्ह्यांतून १ ऑक्टोबरला कर्नाटकात पोहोचेल.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाईल आणि 150 दिवसांच्या कालावधीत तामिळनाडूमधील कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत 3,570 किमी अंतर कापेल. या दौऱ्यात देशातील 22 शहरांमध्ये रॅली होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details