मेष -आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.
वृषभ -आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन -आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.
कर्क -आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल.
सिंह - आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे,
कन्या - आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल.