मेष -आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई व स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल.
वृषभ -आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
मिथुन - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.
कर्क -आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.
सिंह -आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील व लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
कन्या -आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयाराधनेत यशस्वी व्हाल. शेअर - सट्टा ह्या पासून सावध राहा.