महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Daily Horoscope : 'या' राशींच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल, वाचा, शनिवारचे राशिभविष्य - HOROSCOPE FOR THE DAY

31 डिसेंबर 2022 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. 31 DECEMBER 2022 . HOROSCOPE FOR THE DAY 31 DECEMBER 2022 . Rashi Bhavishya. Saturday Rashi Bhavishya

Daily Horoscope
शनिवारचे राशिभविष्य

By

Published : Dec 31, 2022, 12:15 AM IST

31 डिसेंबर 2022 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. 31 DECEMBER 2022 . HOROSCOPE FOR THE DAY 31 DECEMBER 2022 . Rashi Bhavishya. Saturday Rashi Bhavishya

मेष :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कोर्ट - कचेरीची प्रकरणे सांभाळून हाताळा.

मिथुन :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. दुपार नंतर एखाद्या ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील. उच्च पद व मान- प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. त्याच बरोबर अचानक धनलाभ झाल्याने आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल.

तूळ : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल. मित्रांसोबत एखाद्या पर्यटनास जाऊ शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृश्चिक : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात यशस्वी व्हाल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

धनु :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्नेहीजनांशी जवळीक वाढेल.

मकर :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल. शारीरिक दृष्टया स्फूर्ती वाटणार नाही. धन व प्रतिष्ठेची हानी होईल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य लाभेल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस नेऊ शकाल. रचनात्मक व सृजनशील क्षेत्रात मान - सन्मान मिळू शकेल.

मीन :चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. Saturday Rashi Bhavishya

ABOUT THE AUTHOR

...view details