महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

22 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 22 september

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

22  सप्टेंबर राशीभविष्य
22 सप्टेंबर राशीभविष्य

By

Published : Sep 22, 2021, 12:02 AM IST

मेष -मीन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ - मीन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल.

मिथुन -मीन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

कर्क - मीन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

सिंह - मीन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. काळजी कमी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

कन्या - मीन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार व वाहनप्राप्ती होईल.

तूळ - मीन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

वृश्चिक - मीन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा यांचे आकर्षण हानी करेल.

धनू - मीन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज जास्त संवेदनशीलतेमुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

मकर -मीन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. शेअर - सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.

कुंभ - मीन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.

मीन -मीन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. प्रवास होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details