मेष -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आई कडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल.
वृषभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजा पासून जपून राहावे.
मिथुन - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.
कर्क - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.
सिंह -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. संतती संबंधित व व्यावसायिक कटकटींमुळे आजचा दिवस अशांततेत जाईल.
कन्या - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.