मेष - धनु राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल.
वृषभ -धनु राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल.
मिथुन - धनु राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपार नंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल.
कर्क - धनु राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.
सिंह -धनु राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील व त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल.
कन्या -धनु राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.