मेष -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. नशिबाची साथ मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. काही नियोजित आर्थिक लाभ होतील.
वृषभ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी सुद्धा वाद संभवतात. कामात विलंबाने यशप्राप्ती होईल, तेव्हा धैर्याने वागावे लागेल.
मिथुन -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
सिंह - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या -आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह होईल.