महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

12 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत पदोन्नती मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

By

Published : Feb 12, 2022, 12:02 AM IST

मेष -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही करता येईल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार - विनिमय करण्यास संधी मिळेल.

वृषभ -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्चा दरम्यान संघर्ष होऊ शकतो. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.

मिथुन -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा.

कर्क -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.

सिंह - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.

कन्या -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.

तूळ - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.

वृश्चिक -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.

धनू -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.

मकर -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.

कुंभ -आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.

मीन - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details