मेष -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो बौद्धिक चर्चा टाळाव्यात.
वृषभ -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानहानी संभवते.
मिथुन - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ लाभेल.
कर्क -आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा जास्त खर्च होईल.
सिंह - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज व मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर मात्र मित्र- स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.
कन्या - आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोर्ट-कचेरीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. धनहानी व मानहानी होण्याची शक्यता आहे.