महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

11 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 11 october

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

11 ऑक्टोबर राशीभविष्य
11 ऑक्टोबर राशीभविष्य

By

Published : Oct 11, 2021, 12:04 AM IST

मेष -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार - व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.

वृषभ -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.

मिथुन -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या - फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल.

कर्क -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

सिंह -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चा टाळणे हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.

कन्या -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक व शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. शक्यतो आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळावे.

तूळ -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल. एखादा प्रवास संभवतो. सहकार्यांशी संबंध चांगले राहतील.

वृश्चिक -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कुटुंबीय दुखावतील व त्यामुळे कटुता निर्माण होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.

धनू -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपणाला लाभ होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मकर -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट- कचेरीची कामे जपून करावीत.

कुंभ -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन -आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details