महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

06 August Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांनी आज शक्यतो प्रवास टाळावा; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

06 August Rashi Bhavishya
06 August Rashi Bhavishya

By

Published : Aug 6, 2022, 12:04 AM IST

मेष -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल.

वृषभ - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहोपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल. सामाजिक मान- सम्मान होतील.

मिथुन - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.

कर्क -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. मनात विचारांचे वादळ उठेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.

सिंह - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

कन्या -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील. नशिबाची साथ मिळेल.

तूळ -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.

वृश्चिक -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे. दुपार नंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. शारीरिक व मानसिक स्वस्थता जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनासाठी पैसा खर्च कराल.

धनू -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा.

मकर -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपार नंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारात लाभ होतील.

कुंभ -तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती होईल.

मीन - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपार नंतर अनुकूलता लाभेल. व्यवसायात सावध राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.

ABOUT THE AUTHOR

...view details