मुंबई :जन्मकुंडलीतील 9 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आज संपूर्ण दिवस तुम्ही आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवणार असून नव्या वस्त्रांसह दागिन्यांची खरेदी करू शकाल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात अन्यता मोठ्या खर्चात वाढ होऊ सकतो. आरोग्याची काळजी घेऊन आपली कृती नियंत्रित ठेवण्याची तुम्हाला आज गरज आहे.
वृषभ : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूपच लाभदायी असून कौटुंबिक वातावरण त्यामुळे आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकल्याने व्यवसायात सहकारी तुम्हाला मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटून एखाद्या सहलीचा बेत तुम्ही आज ठरवू शकाल, मात्र भागीदारांशी मतभेद संभवतात.
मिथुन : वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे तुमच्यासाठी चांगले ठरणार असून संततीविषयक तुम्हाला आज काळजी वाटेल. दुपारनंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया तुम्हाला ताजेतवाने वाटून तुमचे शारीरिक स्वास्थ्य आज सुधारेल.
कर्क :आज काही ना काही कारणाने तुम्हाला नैराश्य आल्यामुळे त्याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीचा व्यवहार आज करणे चांगले नसल्याने हानी होईल, दुसरीकडे आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठून दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन तुम्हाला आज शारीरिक प्रसन्नता जाणवणार आहे. नव्या कामात अडथळे येतील.
सिंह : आज तुम्हाला अचानकपणे प्रवास घडून नवीन कार्यारंभासह परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक केल्यामुळे दुपारनंतर तुम्ही आज अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढन आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह असून आईच्या प्रकृतीकडे आज तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल.