महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना प्रेमाचा मिळेल सुखद अनुभव, आर्थिक लाभाचीही आहे शक्यता, वाचा राशी भविष्य - राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 8 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2023, 5:44 PM IST

मुंबई :जन्मकुंडलीतील 8 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष :आज आपणास सुखदायी दाम्पत्य जीवन मिळून हिंडण्याफिरण्यातून सगळेच मनासारखे मिळू शकणार आहे. आयात, निर्यात व्यापाराशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांना लाभासह यश मिळून हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्याता आहे. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येऊन आर्थिक लाभासह वाहनसुख मिळणार आहे.



वृषभ : आज तुम्ही ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील त्यासह अपूर्ण कामे पूर्ण होऊन शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्याता असून आनंदाची बातमीही आज तुम्हाला मिळणार आहे.




मिथुन :आज संतती, वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी राहणार असून वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका, अन्यथा नुकसान होईल. आत्मसन्मान दुखावला जाऊन मैत्रिणींमुळे खर्चासह नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त झाल्याने नवीन कार्यारंभासह प्रवास शक्यतो टाळण्याची गरज आहे.




कर्क :आज तुम्हाला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळून छातीत दुखून किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्रीयांशी भांडण झाल्याने सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याच्या दुःखाने तुम्हाला आज वाईट वाटेल. वेळेवर जेवण मिळणार नसल्याने निद्रानाश होऊन धन खर्चासह अपयशाची शक्यता आहे.


सिंह : आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी तुमच्या मनावर राहिल्याने तुम्हाला प्रसन्न वाटून भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्रांसह एखादा प्रवास होऊन आर्थिक लाभासह प्रिय व्यक्तीचा सहवासामुळे आपण खुश व्हाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ केल्यामुळे अचानक नशिबाची साथ मिळण्याची शक्याता आहे.


कन्या : आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहारामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होऊन विद्यार्जनासाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. हौसमौजेवर खर्च होऊन अवैध प्रवृत्तीपासून मात्र तुम्हाला आज दूर राहण्याची गरज आहे.


तूळ : आज तुम्हाला तुमचे कला कौशल्य दाखवण्यास सुवर्ण संधी मिळणार असून आपली कलात्मक, रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहून मनोरंजन कार्यक्रमात मित्र, कुटुंबियांसह सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास मिळून कार्य साफल्याची आज शक्यता असून तुमच्या दाम्पत्य जीवनात आज गोडी राहणार आहे.



वृश्चिक : आज विदेशात राहणारे स्नेही, नातलगांकडून आनंददायी बातम्या तुम्हाला मिळाल्याने तुम्ही आनंदी होण्याची शक्यता आहे. आनंद प्राप्तीसाठी तुमचा आज पैसा खर्च होऊन दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात तुम्ही आज वेळ घालवाणार आहात. कोर्टकचेरीच्या प्रकरणात मात्र सांभाळून काम करणे आज तुम्हाला उचित ठरणार आहे.



धनू : आज तुमच्या संसारात सुखशांती नांदून प्रिय व्यक्तीचा सहवास आज तुम्हाला संस्मरणीय राहणार आहे. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घेतल्याने तुमचा दिवस आज खास बनणार आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढल्याने उच्चाधिकारी व वडीलधारी यांची मर्जी तुमच्यावर आज राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवून तुम्हाला आज उत्तम भोजन प्राप्तीमुळे आनंद होईल.



मकर : आज व्यापार, व्यवसायात लाभ होऊन वसुली, प्रवास, मिळकत यासाठी आजचा दिवस तुम्हाला खूप लाभदायक आहे. सरकारी कामात यश मिळून नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करील, त्यासह बढतीचीही शक्यता आहे. पित्याकडून लाभ होऊन संततीच्या शिक्षणासंबंधी आज तुम्हाला समाधान लाभून तुमची प्रतिष्ठा वाढेल.


कुंभ :आज शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी, उबग जाणवून तुम्हाला चांगलाच त्रास जाणवेल, मात्र तरीही मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. शरीरात स्फूर्ती जाणवणार नसल्याने कामात उत्साह वाटणार नाही, त्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौजमस्ती हिंडण्याफिरण्यावर आज तुमचा खर्च होऊन दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या मिळून संततीविषयक समस्या आज तुम्हाला सतावणार आहे, मात्र आज तुम्ही प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका.


मीन :आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असून आजारावर तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. अचानक खर्च वाढल्याने इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवणार आहे. आज तुमचे तुमच्या कुटुंबियांशी मतभेद होणार असल्याने तुम्हाला आज घरच्यांशी जपून बोलण्याची गरज आहे. अचानक धनलाभाने तुमचा त्रास दूर होऊन मनाला शांती लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details