महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने होईल अपार आनंद , वाचा राशी भविष्य - राशी

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 7 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 6, 2023, 5:49 PM IST

Updated : Apr 7, 2023, 6:42 AM IST

मुंबई :जन्मकुंडलीतील 7 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आज सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रांत तुम्ही प्रशंसेस पात्र ठरणार असून तुम्हाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख अनुभवून तुम्ही आज बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकता, मात्र तुम्हाला आज वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटला, तरी एखाद्या व्यवहारातून तुम्हाला अधिक लाभ होण्याची आज शक्यता आहे.

वृषभ : आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊन मानसिक स्वास्थ्य लाभून तुमचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ होण्यासह अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने तुम्हाला अपार आनंद होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होणार आहे, त्यासह आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मिथुन : आज वैवाहिक जोडीदारासह संततीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागून वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बौद्धिक चर्चेपासून आज तुम्ही दूर राहण्याची गरज आहे, अन्यथा मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता असून पोटाच्या तक्रारी तुम्हाला आज त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता असून प्रवासात त्रास होणार असल्याने प्रवास शक्यतो टाळा.

कर्क : आज ग्लानीमुळे तुमचे मन दुःखी राहून प्रफुल्लता, स्फूर्ती आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊन पैसा खर्च होऊनही कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नसून तुम्हाला आज निद्रानाश त्रास देऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.

सिंह : आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानात जाऊन भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळाल्याने संबंधामधील भावनांची जाणीव तुम्हाला होईल. एखाद्या रम्यस्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवल्याने तुमच्या मानसिक चिंता दूर होतील.

कन्या : आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल्याने इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहून वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळण्याची गरज आहे.

तूळ : आज तुम्ही आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे केल्यामुळे सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभल्याने तुम्ही आज दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल.

वृश्चिक : आज तुमचा एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता असून एखाद्याशी वाद सुद्धा होऊ शकतात. तुमच्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता असल्याने तुम्हाला संयम राखून बोलण्याची गरज आहे. शारीरिक कष्ट, मानसिक चिंता यामुळे त्रस्त होऊन हर्ष आनंदासाठी तुम्हाला आज खर्च करावा लागेल.

धनू : आज वैवाहिक जीवनाचा तुम्ही पूर्ण आनंद उपभोगू शकणार असून मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ होऊन तुम्हाला आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिलणार आहे.

मकर : आज व्यावसायिक कामात तुम्हाला लाभ होऊन जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्रांसह संबंधितांकडून लाभ होऊन त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने तुम्हाला आज आनंद होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्तीपासून मात्र सावध राहावे लागून व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल.

कुंभ : आज तुम्हाला शारीरिक अस्वास्थ्य जाणवून मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहणार आहे. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नसल्याने वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होऊन परदेशातून काही चांगल्या बातम्या येतील.

मीन : आज तुम्हाला मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील मात्र अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होऊन प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवून चुका होऊ नयेत, म्हणून संयमित राहणे हितावह राहील.

Last Updated : Apr 7, 2023, 6:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details