महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना परोपकार मनाला देतील आत्मिक आनंद, स्त्री मित्रांकडूनही होईल लाभ, वाचा राशी भविष्य - भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 6 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 6, 2023, 5:00 AM IST

मुंबई :जन्मकुंडलीतील 6 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी तुम्हाला अनुकूल असून व्यावसायिक दृष्टयाही तुम्हाला फायदेशीर आहे. आज शारीरिक मानसिक उत्साह तुम्ही अनुभवणार आहात. मित्रांसह स्वकीयांकडून तुम्हाला आज भेटवस्तू मिळणार असून त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. आज तुम्ही सद्भावनेने केलेले परोपकार तुमच्या मनाला आत्मिक आनंद देणार आहेत.

वृषभ : आज तुमच्या बोलण्याच्या जादूने कोणीतरी प्रभावीत होऊन त्यातून तुमचा फायदा होणार असून मधुर सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळून वाचनासह लेखनाच्या तुमची आज प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता, कुशलता प्रगतीस सहायक होणार आहे. प्रेयसीचा सहवास लाभल्याने तुमचा दिवस आज आनंदात जाणार असून पोटाच्या तक्रारीने त्रस्त होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आज द्विधा अवस्थेतील तुमचे मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नसून वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करुन पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

कर्क : आज तुम्हाला शारीरिक मानसिक उत्साहाबरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहणार असून मित्रांकडून लाभ होण्याची शक्याता आहे. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस तुम्हाला खूप अनुकूल आहे. कामातील यशासह प्रियव्यक्तीचा सहवासामुळे तुम्ही आज आनंदीत राहाल त्यासह आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह : आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत तुम्ही घालवल्याने त्यांचे सहकार्य मिळून स्त्री मित्रांकडून विशेष मदत तुम्हाला आज होणार आहे. तुमच्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घेतल्याने तुम्हाला नियोजित कामात यश मिळेल.

कन्या : आजच्या लाभदायक दिवसाने तुमची वैचारिक समृद्धी वाढून वाकचातुर्य, मधुरवाणीच्या मदतीने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. आज तुमचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहणार असून आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास आणि प्रवासामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल.

तूळ : आज थोडा सुद्धा असंयम, अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकण्याची शक्याता असल्याने काळजी घ्या. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता असून सगे सोयऱ्यांशी आज तुमचे पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होऊन भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होण्याची शक्याता असल्याने शारीरिक, मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक आज नोकरी, व्यवसायात तुम्हाला लाभप्राप्ती होऊन मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवण्याची शक्यता आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी असून वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनू शकतात.

धनू : आजचा दिवस तुम्हाला कार्य साफल्याचा असून नवे काम सुरू करण्यास योग्य संधी आहे. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजनासह विस्तार करू शकतील, त्यासह तुम्हाला आज मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील त्यासह गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल.

मकर : आजचा दिवस तुम्हाला बौद्धिक कार्यासह साहित्य लेखनासाठी अनुकूल असून व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येणार आहे. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करुन शारीरिक थकवा जाणवू शकतो.

कुंभ : आज तुम्ही नकारात्मक विचारापासून दूर राहण्याची गरज असून भांडणापासून सुद्धा दूर राहावे लागणार आहे. राग आणि बोलण्यावर संयम न ठेवल्याने कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवून खूप विचार केल्याने मानसिक थकवा येईल.

मीन : आज तुम्ही दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ देण्यासह स्वजनांसह सहलीला जाण्याची शक्यता आहे. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळून आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details