मुंबई :जन्मकुंडलीतील 4 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आज तुमची साहित्य निर्मिती, कलात्मक अभिरुची वाढवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहणार असून दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपला संघर्ष होऊन कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होणार आहेत.
वृषभ : आज तुमच्या मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार असून स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळण्याची गरज आहे. आज तुम्हाला नकारात्मक विचार दूर सारावे लागणार असून दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे.
मिथुन : आज तुमच्या भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने तुमचा फायदा होणार असून स्नेहीजनांचा सहवास तुम्हाला घडणार आहे. दुपारनंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसून त्रास होईल, त्यासह भोजनाची वेळ पाळू शकणार नाही.
कर्क : आज तुम्हाला तुमच्या घरातील सर्वांचे सहकार्य मिळून तुमच्या बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे तुमची कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपारनंतर सहलीचा बेत ठरवल्याने सहकाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होणार आहेत.
सिंह : आज तुमची कार्यपद्धती खंबीर मनोबलयुक्त राहणार असून मोठ्या लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार असून बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, मात्र दूर राहणाऱ्या स्वकीय आणि मित्रांशी खूप कालावधीनंतर होणारा एखादा व्यवहार आज लाभदायी ठरेल.
कन्या : भावनेच्या भरात तुम्हचे आज चुकीचे पाऊल पडणार असल्याने काळजी घेऊन गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता असून कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च वाढल्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
तूळ : आज तुमच्या कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे चांगले राहणार आहे. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल, मात्र मित्रांकडून विशेष लाभ होणार आहेत.
वृश्चिक : आज व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कामाची खूप प्रशंसा होऊन कामेही सहज पूर्ण होणार आहेत. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आज तुम्हाला दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होऊन गृहस्थ जीवनात गोडी राहणार आहे. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होऊन दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहणार आहे.
धनू : आज तुप्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. पित्याकडून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
मकर : आज तुम्हाला आजारपणावर खर्च करावा लागणार असून अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद होऊन बाहेरचे खाणे पिणे टाळा, अन्यथा आजाराला बळी पडावे लागणार आहे.
कुंभ : आज तुम्हाला व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागणार असून वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होऊन घरातील वातावरण समाधानाचे राहणार आहे. मात्र दैनंदिन कामात अडचणी येऊन नोकरीत वरिष्ठांशी वाद झाल्याने तुमचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे.
मीन : आजचा तुमचा दिवस मध्यम फलदायी असल्याने कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील, मात्र दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळणार असले तरी, वैवाहिक जोडीदाराशी मतभेद झाल्याने त्रास होऊ शकतो. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होऊन आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळणे अवघड होईल.