Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांनी मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्याने होईल लाभ, वाचा राशी भविष्य - भविष्य
कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 30 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
संग्रहित छायाचित्र
मुंबई :जन्मकुंडलीतील 30 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : तुम्हाला आज अती विचाराने मनावर खूप ताण आल्याने मन हळवे होईल. वादविवाद होऊन आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उद्भवणार असून नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. तुम्हाला वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होऊन एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यताही आहे.
- वृषभ : तुम्हाला आज सुरुवातीलाच काही अडचणी निर्माण होतील, मात्र तरी आज तुम्हाला आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येणार आहे. मित्र, स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित होऊन तम्हाला आज व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळणार आहे. तुमचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहून तुम्ही आज नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.
- मिथुन : आज तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहिल्याने आप्तेष्टांच्या सहवासात तुम्ही आज वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागून दुपारनंतर तुम्हाला आर्थिक नियोजनात काही चूक झाल्याचे वाटेल. तुम्हाला आज आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागून नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे.
- कर्क :आज तुम्हाला उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवून नेत्र विकारही होऊ शकतात. तुमच्या एखाद्या वक्तव्याने तुम्ही आज अडचणीत येऊ शकाल मात्र दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. तुमच्या मनातील नकारात्मक विचार आज काढून टाकल्यास कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल आणि आर्थिक लाभ मिळतील.
- सिंह : आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागणार असून आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होऊन तुमची आज कुटुंबियांसोबत कटुता निर्माण होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊन आरोग्यात सुधारणा होईल मात्र खर्च नियंत्रित ठेवावे लागतील.
- कन्या : आज सकाळची वेळ तुम्हाला आनंदासह लाभदायी असून सार्वजनिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. आज तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार असून दुपारनंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होऊ शकते. प्रकृतीच्या तक्रारी उदभवून वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
- तूळ : आज तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहणार असून नोकरी, व्यवसायात उत्साहित होऊन तुम्ही कामे कराल. शासकीय कामे सहजपणे होऊन आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. पत्नी आणि संतती संबंधित लाभ होऊन मित्रांच्या सहवासाने आनंद होईल.
- वृश्चिक : आज विरोधकांसोबत वाद होऊन नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहणार आहे. संततीशी मतभेद होऊन दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटून कौटुंबिक जीवन समाधानी राहील.
- धनू : आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता असून शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत होऊन प्रतिस्पर्धी व विरोधकांशी वाद होऊ शकतात.
- मकर : आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरण्यास जाऊन तुम्ही आनंदित होणार आहात. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असून खर्चात वाढ होऊ शकते.
- कुंभ :तुम्हाला आजचा दिवस कार्य सफलतेचा असून तुमच्या कीर्तीत आज भर पडणार आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहणार असून सामाजिक मानसन्मानात वाढ होईल. दुपारनंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना तुम्ही सहभागी करून घेऊ शकणार आहात.
- मीन : आजचा दिवस तुम्हाला आनंदचा असून मित्रांसह प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा तुम्ही खूप आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल असून घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ होऊ शकतो, मात्र काही कारणाने तुमच्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यता मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
Last Updated : Mar 30, 2023, 6:13 AM IST