मुंबई : जन्मकुंडलीतील 2 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी दिवस असून आज तुम्हाला खूप शारीरिक थकवा जाणवणार आहे. आज शक्यतो हट्टीपणा सोडून प्रवास टाळण्याची गरज असून पोटाच्या तक्रारी उदभवल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नसल्याने त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असून पैतृक संपत्तीपासून तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुमचे वडील तुमच्यासोबत खूप चांगल्या रितीने वागणार असून खेळाडूंसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. कलाकारांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल मात्र संततीसाठी खर्च करावा लागू शकतो.
मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असून भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवा अन्यथा मोठ्या नुकासानाला तुम्हाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तुमच्या मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलत राहणार आहेत, त्यातून तनमनाला स्फूर्ती लाभणार आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस तुम्हाला दिवस अनुकूल असून तुम्ही आज विरोधकांना नामोहरम करू शकाल.
कर्क : आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी असून तुमच्या मनावर मरगळ कायम राहणार आहे. केलेल्या कामाचे तुम्हाला समाधान वाटणार नसून तुमची प्रकृतीही ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असून तुमचा आज कुटुंबातील नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहिल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.
सिंह :प्रत्येक काम दृढ विश्वासाने तुम्ही आज पूर्ण करणार असून तुम्हाला आज सरकारी कामात यश मिळेल. तुम्हाला आज उतावीळपणा सोडावा लागून काहीही कारणाने तुमचा आज संताप वाढणार आहे. तुम्हाला आज पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असल्याने खाण्यापिण्याकडे तुम्हाला आज लक्ष द्यावे लागणार आहे.
कन्या : तुम्ही आज दिवसभर शारीरिक, मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहणार असून आज तुमचा कोणाशीही अहंकारामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरी संबंधी कामात सावध राहावे लागून अचानकपणे खर्च उदभवणार आहेत. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत याबाबतची काळजी घ्या, मात्र आज तुमचा धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा अन्यथा संतापामुळे कामात व्यत्यय येईल. तुम्हाला आज मानसिक बेचैनी जाणवणार असून नोकरीत हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहावे लागणार आहे.
तूळ :तुम्हाला आज विविध स्तरांवर लाभ होऊन मित्रांच्या सोबत एखाद्या रमणीयस्थळी सहलीला जाण्याचा योग आज तुम्हाला आहे. घरात पत्नी कडून काही सुखद बातमी मिळून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होऊन एखाद्या स्त्रीमुळे चांगलाच फायदा होणार असून मनासारखे वैवाहिक सौख्य आज तुम्ही उपभोगू शकणार आहात.
वृश्चिक : आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद मिळून तुमची सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. तुम्हाला आज व्यापारासाठी प्रवास करावा लागून मित्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
धनू :आज तुम्हाला प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून शरीरास थकवा जाणवणार आहे. तुमची प्रकृती सुद्धा आज नरम गरम राहणार असून मनात चिंता आणि व्याकुळता राहण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नशीबाची साथ मिळणार नसल्याने जोखमीच्या कामापासून शक्यतो दूर राहण्याची गरज आहे. आज तुमचे कार्य साफल्य होणे कठीण असल्याने वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे.
मकर :तुम्हाला आज नोकरीतील परिस्थिती अनुकूल राहणार असून तुम्ही आज कार्यालयीन कामे कौशल्यपूर्वक कराल. सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची तुम्हाला आज संधी मिळणार असल्याने खाणेपिणे, हिंडणेफिरण्याकडे तुमचे लक्ष राहील. तुम्हाला आज गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असून नकारात्मक विचारांपासून तुम्ही आज दूर राहणे हितावह राहील.
कुंभ : आज तुमच्यात खंबीर मनोबलासह दृढ आत्मविश्वास दिसून येणार असून प्रणयमुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढल्याने जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन करण्याची शक्यता आहे. विवाहिताना वैवाहिक सुख चांगले मिळणार असून तुमच्या सामाजिक मानसन्मानात आज वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन :आजचा दिवस तुम्हाला मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारा असून आज तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. तुमच्या घरात शांततेसह आनंदाचे वातावरण असल्याने तुमची दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. तुमचा स्वभाव आज उतावळा बनणार असून तुम्हाला बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवण्याची आज गरज आहे. आज स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून सहकाऱ्यांसह नोकरांचे अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.