Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना स्त्री मित्रांकडून होईल लाभ, दिवस जाईल आनंदात, वाचा राशी भविष्य - राशी
कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 12 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
संग्रहित छायाचित्र
मुंबई : जन्मकुंडलीतील 12 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आज तुम्हाल थकवा, आळसासह व्यग्रता जाणवून उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने तुमची आज कामे बिघडून नोकरीच्या ठिकाणी आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची आज तुम्हाला संधी मिळेल, मात्र आपल्यामुळे वातावरण खराब होणार नसल्याची खात्री करा.
- वृषभ : आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवल्याने अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ करणे चांगले नसल्याचे स्पष्ट आहे. आज तुम्हाला आहाराची विशेष काळजी घ्यावी लागून आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आज नियोजीत वेळेत तुमचे काम पूर्ण होऊ शकणार नसल्याने मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे.
- मिथुन : आजचा दिवस मनोरंजन तुम्हाला आनंद साजरा करण्याचा असून आज तुम्ही मित्र, कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवणार आहात. सामाजिक सन्मानासह आज तुम्हाला प्रसिद्धी मिळून तुम्ही दाम्पत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल.
- कर्क : आजचा दिवस तुम्हाला आनंददायी, यशदायी असून कुटुंबीयांसह तुमचा आनंदात वेळ आज जाणार असून महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील.
- सिंह : आज तुमचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहून सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळून मित्रांचा सहवास तुम्हाला आज आनंद देणारा ठरणार आहे.
- कन्या : आजचा दिवस तुम्हाला प्रतिकूलतेचा असल्याने अनेक गोष्टींची काळजी तुम्हाला लागून राहणार आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवल्याने तुमचे आज कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडल्याने तुम्ही आज अस्वस्थ होणार आहात, त्यासह कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करण्याची आज नितांत गरज आहे.
- तूळ : आज तुम्हाल नशिबाची साथ लाभून तुमच्या भावंडांशी तुमचे सौहार्दतेचे संबंध राहणार आहेत. एखाद्या प्रवासाचे नियोजन करुन नवीन कार्यारंभास आजचा दिवस तुम्हाला अनुकूल आहे. परदेशातून आनंददायी बातमी येऊन हितशत्रूंवर तुम्ही आज मात करू शकणार आहात.
- वृश्चिक : अनावश्यक खर्चावर आज तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार असून वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुखशांति नांदू शकणार आहे. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागून एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल.
- धनू : आज तुम्ही नियोजित कामे केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नातेवाइकांकडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊन तुम्हाला स्वकीयांना भेटून आनंद होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळाल्याने आजचा आपला व्यवहार सामान्य राहील.
- मकर : आजचा दिवस तुम्हाला सावध राहण्याचा असून तुमच्या कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढणार आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता असून सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल, त्यामुळे खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता असल्याने संतती, नातेवाईकांशी आज तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे.
- कुंभ : नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असून नोकरीत तुम्हाला आज फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे तुमची कामे आज होऊन मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्याता आहे. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळून आज तुमचे संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. पत्नी, संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळून एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल.
- मीन : आज तुमची कामे यशस्वीपणे होऊन वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश झाल्याने तुमचा दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होऊन वडिलधाऱयांकडून तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. एखादा मोठा आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.
Last Updated : Apr 12, 2023, 6:19 AM IST