मुंबई : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 03 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
मेष : आज तुम्ही अधिक हळवे, भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहानसहान गोष्टींनी तुमच्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी असून संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार सल्याची दक्षता घ्यावी लागून स्त्रीमुळे तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता असल्याने जलाशयापासून तुम्ही शक्यतो दूर राहण्याचा आज प्रयत्न करा.
वृषभ : आज तुमच्या चिंता दूर होऊन उत्साहात वाढ होणार असून मन आनंदी राहील. जास्त भावूक, हळवे झालात तरी, तुमची कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करुन स्वादिष्ट भोजनाचा लाभ होणार आहे.
मिथुन : आजचा तुम्हाला दिवस मिश्र फलदायी असून आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नतेचा संमिश्र अनुभव येणार आहे. निर्धारित कामे पूर्ण करूनही धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल.
कर्क :आजचा दिवस सर्व दृष्टीने तुम्हाला आनंददायी असून शारीरिक व मानसिक दृष्टया आज तुम्ही आनंदी राहणार आहात. कुटुंबीयांकडून सौख्य आनंदाची प्राप्ती होणार असून त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील. वैवाहिक जीवनात सौख्य मिळणार असून मन जास्त संवेदनशील होण्याची शक्याता आहे.
सिंह :आज तुम्हाला तुमच्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागणार असून आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याने शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्टकचेरीतील कामे जपून करण्याची आज गरज आहे. विदेशातून काही बातमी मिळाली, तरी स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करण्याची आज तुम्हाला गरज आहे.
कन्या : आजचा दिवस तुम्हाल लाभदायक असून विविध पातळ्यांवर यश, कीर्ति आणि लाभ होईल. मैत्रिणींकडूनही काही लाभ झाल्याने तुमचा दिवस आज आनंदात जाणार आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होऊन व्यापारात धनवृद्धी होण्याची शक्याता आहे. जलाशयाच्या ठिकाणी फिरण्यास जाण्याचा बेत ठरवून संतती विषयक आनंददायी बातमी तुम्हाला आज मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान लाभून कार्यालयीन कामानिमित्त तुम्ही प्रवासाचे बेत आखणार आहात.
तूळ : घरात, कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज वातावरण अनुकूल राहणार असून नोकरीत बढतीची संधी लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे, त्यासह वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मातेकडून लाभ होऊन तुम्ही आज वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल.
वृश्चिक : आज तुम्हाला शारीरिक थकवा, आळस, मानसिक चिंता अनुभवण्यास मिळणार असून व्यवसायातही अडचणी येतील. संततीशी मतभेद होऊन त्यांच्या तब्बेतीची काळजीही तुम्हाला आज राहणार आहे.
धनू : आज तुम्हाला खूप सावध राहावे लागण्याची शक्याता असून कोणतेही नवीन काम आज सुरू करणे आपल्या हिताचे राहणार नाही. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे तुमची मनःस्थिती दुःखी होणार असून पाण्यापासून सावध राहावे लागेल. आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागून अवैध कामांपासूनही दूर राहणे तुमच्या हिताचे राहणार आहे.
मकर :आज तुम्हाला दैनंदिन काम सोडून मनोरंजन, गाठी भेटीत वेळ घालवावा लागणार असून स्वादिष्ट भोजनही मिळण्याचा योग आहे. मित्रांसह फिरायला जाऊन भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची शक्यता असून व्यापार वाढेल.दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होणार असून मानसन्मान वाढणार आहे.
कुंभ: आजचा दिवस तुम्हाला कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी असून कार्यातील यशाने तुमची प्रसिद्धी होईल. आज तुमचे तनमन उत्साही राहणार असून भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने कार्य तडीस नेऊन कामानिमित्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मीन :आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत करणार असून साहित्य लेखनात तुम्ही सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असून प्रिय व्यक्तीचा सहवास आज तुम्हाला लाभ होणार आहे. प्रेमालाप होऊन आजच्या दिवशी तुम्हाल शेअर बाजारात लाभ होण्याची शक्यता आहे.