नवी दिल्ली -प्रत्येकाला मऊ आणि चमकदार त्वचा हवी असते. पण व्यस्त जीवनशैलीमुळे आपली त्वचा सूर्यप्रकाशात नेहमी राहते. कामासाठी घराबाहेर राहणाऱ्या लोकांवर त्याचा जास्त परिणाम पहायला मिळतो. परिणामी, सोप्या घरगुती उपचारांच्या मदतीने आपण सूर्यापासून त्वचेला होणाऱ्या टॅनिंगला टाळू Home Remedies for Sun Tanning शकतो. आणि त्वचा तजेलदार बनवू शकतो. त्याशिवाय योग्य आहार आणि आराम हेही तितकच महत्त्वाचे आहे. जाणून घ्या आपण कसे टाळू शकतो सन How to avoid sun tanning टॅनिंगला.
लिंबाचा रस आणि मध -लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट Lemon juice and honey pack आहे. जो सन टॅन काढून टाकण्यास मदत करतो. यासाठी ताज्या लिंबाचा रस घेवून आणि त्यात एक चमचा मध घालावा. मृत पेशी काढून टाकण्यासाठी म्हणजेच स्क्रब करण्यासाठी आपण थोडी साखर देखील घालू शकता आणि हळूवारपणे आपली त्वचा स्क्रब करू शकता. 2-3 मिनीटे हा स्क्रब करा. 20-30 मिनिटे हा फेस पॅक लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
बेसन, हळद आणि दही -बेसन म्हणजेच चण्याचे पीट. त्वचेचा टोन हलका करण्यास मदत करते. तर हळद हे एक उत्कृष्ट त्वचा उजळणारे घटक gram flour turmeric and curd आहे. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे तुमची त्वचा उजळवते. बेसन, दही आणि हळद यांची पेस्ट बनवून त्वचेला लावा. 15 मिनिटे पॅक लावून कोरडे होऊ द्या आणि ते धुताना हळूवारपणे स्क्रब करा.
पपई, टोमॅटो, टरबूज, बटाटा आणि काकडी -पपई एक्सफोलिएटिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि त्यात नैसर्गिक एंजाइम Papaya Watermelon Potatoes Tomatoes असतात. हे एक अतिशय चांगले नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील आहे. बटाट्याचा रस फक्त ब्लीचिंग एजंट नसून डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे हलकी करतो. टोमॅटो त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो आणि त्वचा उजळण्यास देखील मदत करतो. काकडी एक सनसनाटी शीतलक आहे आणि टॅन काढून टाकण्यास मदत करते.