महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 7, 2023, 8:22 PM IST

ETV Bharat / bharat

Holi 2023 : 2023 मध्ये कधी आहे होळी?, जाणून घ्या होळीचा इतिहास, पंचांग, शुभ मुहूर्त सविस्तरपणे

मार्च महिन्यात होळीचा सण साजरा होणार असला तरी, त्याची तयारी सुरू झाली आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला यावेळी होळी दहन कधी आहे आणि कोणत्या दिवशी होळी साजरी केली जाईल, शुभ वेळ, पंचांग काय आहे याची माहिती देत ​​आहोत.

Holi 2023
होळी 2023

आपल्या देशात होळी हा सण देशभरात वेगवेगळ्या परंपरेने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी त्याची तयारी वसंत पंचमीपासून सुरू होते, तर काही ठिकाणी माघ पौर्णिमेच्या दिवशी सुरू होते. साधारणत: होळीच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी होळीचे दहन केले जाते त्या ठिकाणी एरंड किंवा इतर कोणत्याही झाडाची फांदी पुरली जाते. या परंपरेला होळीची सुरुवात करणे, असेही म्हणतात.

काय आहे परंपरा : होळी दहनासाठी होळी तयार करण्याची प्रक्रिया 40 दिवस आधी, वसंत पंचमीच्या दिवशी सुरू होते. देशाच्या बहुतेक भागांमध्ये, तयारीची प्रक्रिया 40 दिवस अगोदर सुरू होते. वसंत पंचमीच्या दिवशी या शुभ कार्याची परंपराही देशभर सुरू होते. सहसा, या दिवशी, ते त्यांच्या श्रद्धेनुसार एरंडीच्या झाडाची फांदी किंवा अन्य कोणत्याही झाडाची फांदी पुरतात, जी त्या स्थानिक ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. परंपरेनुसार ठराविक जागी ती फांदी पुरली जाते. प्रत्येक गावात किंवा परिसरात हे ठिकाण आधीच ठरलेले असते. त्यानंतर पुढील 40 दिवस त्याला मोठे स्वरूप देण्यासाठी, त्याच्या जवळ लाकूड आणि इतर गोष्टी गोळा करुन ठेवतात, जेणेकरून होळीला भव्य स्वरूप देता येईल. काही ठिकाणी होलिकाची मूर्तीही ठेवली जाते आणि ठराविक वेळी पूजा करून होळीच्या दिवशी तिचे दहन केले जाते. या दरम्यान अनेक ठिकाणी गाणे देखील गायले जातात.

होळीचा इतिहास : असे म्हटले जाते की, होळीला लावली जाणारी झाडाची फांदी ही भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांचे प्रतीक आहे. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी फांद्या लावल्या जातात. तुम्हाला होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची पौराणिक कथा आठवत असेल, ज्यामध्ये होलिका भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न करते, परंतु भक्त प्रल्हादचे केसाला देखील धक्का लागत नाही आणि होलिका जळून राख होते. म्हणूनच हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

पंचांग :हिंदू धर्मात होळीला खूप महत्त्व आहे. हा रंगांचा सण आहे. तो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. 2023 मध्ये 7 मार्च मंगळवार रोजी होलिका दहन आहे. आणि 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. 6 मार्च 2023 दुपारी 4.17 वाजता पासुन होळी सुरु होते आहे. तर फाल्गुन महिन्याचा शेवट पौर्णिमा तारीख: 7 मार्च 06:09 वाजता होतो आहे. होलिका दहन: 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6:24 ते 8:51 पर्यंत राहील. आणि ८ मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details