मार्च महिन्याची चाहुल लागल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते होळी सणाचे. कोकवासीयांसाठी तर हा शिमगा असतो. रंगांची उधळण करणारा आणि नकारात्मक गोष्टींचं दहन करणारा हा होळी सण होय. होळी म्हणटलं की, महाराष्टात तयार होते ती गरम-गरम तुपाची पुरण पोळी आणि रंगपंचमीला केला जातो तो तर्रि...चने, पोहे सोबत चिवडा. या वर्षी होलिका दहनावर भद्राची सावली असणार की नाही? होळीचे दहन कधी केले जाणार? होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाल पाळला जाणार आहे की नाही, वाचा सविस्तर.
फाल्गुन पौर्णिमा तिथी कधी आहे? : हिंदू पंचागनुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 वाजता सुरु होणार आहे. तर 7 मार्च 2023 ला संध्याकाळी 6.09 पर्यंत असणार आहे. तर उदयतिथीनुसार आपल्याला होळीचे दहन 6 मार्च 2023 करायचे आहे. हिंदू रितीरिवाजानुसार भद्रा मुख आणि भद्रापुच्छ या काळात होळीचे दहन करायचे असते.
होलिका दहनच्या दिवशी भद्राकाळ चे महत्व :हिंदू धर्मानुसार आणि पौराणिकेत उल्लेखानुसार भद्रा काळात होळी पेटविणे हे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की, यमराज हा भद्राचा स्वामी आहे. त्यामुळे भद्रा काळात कुठलही शुभ कार्य करायला नको, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सोडले तर उत्तरेकडील शहरात फाल्गुन महिना सुरु होताच होळीला सुरुवात होते. पंचांग नुसार होलाष्टक सोमवारी 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शास्त्रानुसार या काळात कुठलही शुभ कार्य केले जात नाही. भद्रा काळचा मुहूर्त 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4.48 पासून ते 7 मार्च 2023 ला पहाटे 5.14 पर्यंत आहे.
कुठे - कधी केले जाणार होळीचे दहन? :पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्चला होळीचे दहन आणि 7 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. तर पूर्व भारतात 7 मार्च ला पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये 7 मार्चला होळीचे दहन आणि 8 मार्च ला रंगपंचमी साजरी केली जाईल.
हेही वाचा : Holi 2023 : अशी साजरी होते देशातील विविध राज्यांमध्ये होळी, जाणून घ्या खास पद्धती