कोलकाता - बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चित असलेला मतदारसंघ नंदीग्रामच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होईल. न्यायमूर्ती कौशिक चंदा यांचे एकल खंडपीठ सकाळी याचिकेवर सुनावणी घेईल. पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड आणि निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फेरमोजणीची मागणी फेटाळून लावल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. कधीकाळी ममतांचा सेनापती म्हणून ओळख असलेले सुवेंदू अधिकारी यांनीच त्यांचा पराभव केला. अधिकारी हे भाजपाकडून रिंगणात होते. भाजपाच्या सुवेंदु अधिकारींनी ममतांचा 1736 मतांनी पराभव केला. आधी ममतांना 1200 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, पुर्नमतमोजणीत ममता बॅनर्जी यांचा 1736 मतांनी पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली. त्यानंतर नंदीग्राम निवडणूक निकालाविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते.
विरोधी पक्षनेते आहेत सुवेंदू अधिकारी -