महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

या रुग्णालयात हनुमान चालीसा, रामायणाद्वारे केले जातात हृदयरोग्यांवर उपचार!

Heart Treatment Religious Books : कानपूरच्या डॉक्टरांनी हृदयरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली आहे. येथे रुग्ण दाखल होताच त्यांना रामायण, हनुमान चालीसा आदी धार्मिक पुस्तकं वाचायला दिली जातात. यामुळे उपचारात मदत होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Heart Treatment Religious Books
Heart Treatment Religious Books

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 7:07 PM IST

पाहा व्हिडिओ

कानपूर Heart Treatment Religious Books :हृदयाशी संबंधित आजारांसाठी तणाव हा नेहमीच अत्यंत घातक मानला जातो. तणाव कमी करण्यासाठी डॉक्टर अनेकदा औषधं आणि थेरपीचा अवलंब करतात. परंतु कानपूरच्या सरकारी कार्डिओलॉजी हॉस्पिटलनं हृदयरोग्यांना आराम देण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला आहे. येथील डॉक्टर हृदयरोगाच्या उपचारासाठी औषधाबरोबरच धार्मिक ग्रंथ आणि अध्यात्माची मदत घेतात! याचा रुग्णांवर चांगला परिणाम दिसून येत असल्याचा दावाही येथील डॉक्टरांनी केला आहे.

तणावामुळे रुग्णांच्या समस्या वाढतात : रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीरज सांगतात की, "हृदयविकाराशी संबंधित रुग्ण आला की त्याच्या मनात खूप चिंता असते. त्यामुळे त्याचं बीपी आणि हृदयाचे ठोके लक्षणीय वाढतात. याशिवाय रुग्णाला तणावाचा देखील सामना करावा लागतो. याचा परिणाम हृदयावर होतो आणि त्याच्या समस्या आणखी वाढतात". डॉ. नीरज पुढे सांगतात की, पूर्वी रुग्ण यायचे तेव्हा ते त्यांना मानसशास्त्र चिकित्सा करण्यासोबत संगीत ऐकायला सांगायचे. मात्र, असं केल्यानं फारसा परिणाम दिसून येत नव्हता.

रुग्णांना हनुमान चालीसा, रामायण वाचायला दिली : एका दिवशी डॉ. नीरज यांच्या मनात विचार आला की, लोकांची धर्म आणि अध्यात्मावर खूप श्रद्धा आहे. मग रुग्णांना यासंबंधीची पुस्तकं का दिली देऊ नये. यानंतर त्यांनी रुग्णांना गीता, हनुमान चालीसा आणि रामायण वाचायला देणं सुरू केलं. डॉ. नीरज सांगतात की, सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी रुग्णांना धार्मिक पुस्तकं देण्यास सुरुवात केली. आता याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. असं केल्यानं रुग्णाचं लक्ष धर्म आणि अध्यात्माशी संबंधित गोष्टींकडे केंद्रित होतं. त्यामुळे ताण दूर होऊन त्यांच्या उपचारात खूप मदत होते.

उपचारात मदत होते : डॉ. नीरज यांनी २०२२ मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी सुमारे ५०० रुग्णांना धार्मिक पुस्तक वाचायला दिली आहेत. रूग्णालयात धर्म आणि अध्यात्माची पुस्तके वाचून रूग्णांना आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याची जाणीवच होत नाही, असं ते सांगतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उपचारातही खूप मदत होते. रूग्णांवर उपचार करताना धार्मिक पुस्तकांची मदत घेतल्यानं उत्साहवर्धक परिणाम समोर आल्याचं डॉ. नीरज यांनी सांगितलंय.

हे वाचलंत का :

  1. रावणाच्या सासुरवाडीतल्या तुपानं उजळणार अयोध्येचा राम! पहिल्या आरतीसाठी ६०० किलो तूप रवाना
  2. Ayodhya Ram Mandir : 'या' तारखेला होणार राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारलं

ABOUT THE AUTHOR

...view details