दिल्ली -गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील नागरिक उकाड्यापासून त्रासून गेले होते. मात्र आज आलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आज दहाच्या सुमारास साऊथ दिल्लीत जोरदार पाऊस झाला, तसेच एनसीआरच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे.
हेही वाचा -तेलंगाणामधील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
हवामान खात्याच्या मते, काही भागांत गारा पडू शकतात. दिल्लीत काल रात्रीपासूनच हवामान ठीक नव्हते. दिल्लीत लगातार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्याही निर्माण झाली आहे. देवली आणि खानपूर भागांत पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पावसामुळे तापमानात देखील घट झाल्याचे दिसून आले.