नवी दिल्ली : डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसने (डीजीएचएस) कोविड-19 रुग्णांच्या उपचारांसाठी नवीन व्यापक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये इव्हर्मेक्टिन, एचसीक्यू आणि इनहेलेशनल बडेसोनाइडच्या वापर करणे थांबवण्यास सांगण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढे म्हटले आहे, की कोविड-19 संसर्गाचे निदान आणि तपासणी करण्याच्या उद्देशाने हाय-रेजोल्यूशन सीटी (एचआरसीटी) चेस्ट स्कॅन करू नये. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन या दोन्ही औषधांचा वापर करण्याची शिफारस केली गेली आहे. त्यामुळे यांपैकी कोणत्या सूचनांचे पालन करायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
औषधांच्या परिणामांचे पुरावे नाहीत..
आयसीएमआरच्या वरिष्ठ सल्लागार आणि प्रख्यात आरोग्य तज्ज्ञ डॉ. सुनीला गर्ग म्हणाल्या, "वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हा विकसनशील परिस्थिती आहे. औषधांचा वापर वैज्ञानिक पुराव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे." डीजीएचएसच्या नऊ पानी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सूचित केले गेले आहे; की दीर्घकालीन अडथळा आणणार्या फुफ्फुसीय रोग (सीओपीडी) नसलेल्या रूग्णांमध्ये SpO2 हा ९२ टक्के ते ९५ टक्के दरम्या राखण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा केले जाणे आवश्यक आहे. त्यात म्हटले आहे की स्टेरॉइड्स, अँटी-कोग्युलेंट्स किंवा किंवा रोगप्रतिकारक-मोड्युलेटरद्वारे केलेल्या उपचारांची, त्यांच्या परिणामांनुसार पुन्हा पुन्हा तपासणी केली जाईल.
एचारसीटी स्कॅनही उपयोगी नाही..