महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात आईवडिलांसह एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या - पलवल क्राइम न्यूज

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. लोकांनी सांगितले आहे, की पती-पत्नी यांनी तीन मुलांना विष देऊन ठार मारले. त्यानंतर दोघांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या
आत्महत्या

By

Published : Sep 29, 2021, 1:00 PM IST

Updated : Sep 29, 2021, 2:02 PM IST

पलवल- हरियाणाच्या पलवल येथून मोठी बातमी समोर येत आहे. सांगितले जात आहे, की पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद या गावातील एका कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलिस घटनास्थळी पोहोचली. तीन मुलांसह पती-पत्नीच्या मृतदेहांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे.

हेही वाचा- नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण एवढे विकोपाला गेले की रात्री त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले. पतीचे नाव नरेश (३३), पत्नी आरती (३०), ७ वर्षीय संजय, ९ वर्षीय भावना आणि ११ वर्षीय रविता यांचा समावेश आहे. नरेश आणि त्यांच्या परिवार भावकीत राहत होता. त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख सकाळी उठले तेव्हा त्यांनी ही घटना दिसली. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच स्थानिक लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवले.

हेही वाचा- येत्या ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राहणार तब्बल २१ दिवस बंद

Last Updated : Sep 29, 2021, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details