मुंबई:आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पांड्याला ( Captain Hardik Pandya ) 26 आणि 28 जून रोजी आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. संघातील एकमेव नवा चेहरा म्हणजे महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठी ( Batsman Rahul Tripathi ), ज्याला आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. त्रिपाठीने सनरायझर्स हैदराबादसाठी 400हून अधिक धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत उपकर्णधार पद पांड्याकडे सोपवण्यात आले असून, घरच्या मालिकेनंतर तो इंग्लंडमध्ये कसोटी संघात सामील होणार आहे. राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम फेरीत नेणारा संजू सॅमसन ( Batsman Sanju Samson ) संघात परतला आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार असेल. यष्टिरक्षक 36 वर्षीय दिनेश कार्तिक असेल, पण गरज भासल्यास इशान किशन आणि सॅमसन दोघेही यष्टीरक्षण करु शकतात.