महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 13, 2023, 7:11 PM IST

ETV Bharat / bharat

Lohri : आज तुमच्या थाळीत असु द्या 'पंजाब का तडका', बघा स्वादिष्ट भोजनाची रेसिपी

लोहरी हा भारतातील सर्वात आनंदी आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी नागरिक सामुहिक रित्या एकत्र येऊन अग्नि प्रज्वलित करतात, गाणे म्हणतात आणि पारंपारिक पध्दतीनुसार तयार केलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतात. आज आपण जाणुन घेऊया लोहरी साजरी करणाऱ्या पंजाबी लोकांमध्ये आजच्या भोजनात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असतो.

Lohri
लोहरी भोजन थाळी

हैदराबाद :भारतात दरवर्षी जानेवारी महिन्यात लोहरी साजरी केली जाते. यंदा 14 जानेवारी रोजी देशभरात लोहरी हा सण साजरा केल्या जाणार आहे. पीक कापणीचा हंगाम आणि हिवाळा ऋतुचा शेवट दर्शविणारा लोहरी हा सण आहे. संपूर्ण देश, परंतु विशेषतः पंजाब आणि उत्तर भारत, लोहरी सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.

लोहरी भोजन थाळी

पंजाबी थाळी : या दिवशी नागरिक सामुहिक रित्या एकत्र येऊन अग्नि प्रज्वलित करतात, गाणे म्हणतात आणि पारंपारिक पध्दतीनुसार तयार केलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतात. पीक कापणीचा हंगाम आणि हिवाळा ऋतुचा शेवट, आणि दिर्घ दिवसांची सुरुवात दर्शविणारा लोहरी हा सण आहे. पंजाबी लोकांमध्ये विशेषत: या दिवशी 'सरसो का साग' पासुन ते शेंगदाणे, गूळ आणि तिळापासून तयार केलेल्या विविध मिठाईपर्यंत खाद्यपदार्थांची संपुर्ण यादीच आज आपण जाणुन घेणार आहोत.

लोहरी भोजन थाळी

सरसों का साग आणि मक्के की रोटी :सरसों का साग आणि मक्के की रोटी ही एक पारंपारिक पंजाबी पाककृती आहे. जी लोहरी उत्सवाच्या दिवशी तयार केली जाते. साधे पदार्थ आणि भारतीय मसाले वापरुन ही रेसीपी तीस मिनिटांमध्ये तयार करु शकतो. सरसों म्हणजे मोहरीची झाडाची ताजी पाने आणि मक्का कडधान्याच्या पिठापासुन तयार केलेली भाकरी वजा पोळी असते.

लोहरी भोजन थाळी

गुड की गजक :गुळाच्या गजकांशिवाय (वडी) लोहरी उत्सव पूर्ण होत नाही. गजक हा गोड पदार्थ बाजारात विकत मिळतो किंवा घरी देखील तयार करता येतो. तसेच शेंगदाणे, गुळ आणि तीळ वापरुन वेगवेगळे गोड पदार्थ तयार केले जातात. जसे की, रेवडी, तिळगुळाचे लाडू, ताळाची-शेंगदाणे टाकुन केलेली बर्फी, तिळगुडाची पोळी, इत्यादी.

लोहरी भोजन थाळी

पिंडी छोले :गरम, चविष्ट आणि खरी पिंडी छोलेची थाळी आपल्या हृदयाला आणि आत्म्याला जुन्या दिल्लीच्या अरुंद रस्त्यावरुन सैरसपाटा करुन आणते. पंजाबने जगभरातील खाद्यपदार्थांना हा गॅस्ट्रोनॉमिक खजिना भेट म्हणून दिला आहे. या रेसिपीने तुमच्य़ा थाळीची लज्जत वाढेल. पंजाबी छोले हा कधीपण आणि कुठेही मिळणारा तसेच सहजतेने आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मात्र या दिवशी तो विशेष पध्दातीने तयार केला जातो.

लोहरी भोजन थाळी

चिरौंजी मखाने की 'खीर' आणि दही भल्ले :चिरौंजी मखाने पासुन तयार खीर पौष्टिक आणि लज्जतदार आहे. ही खीर सुका मेवा आणि दुधापासुन तयार केलेली असते, त्यामुळे ती या दिवसांमध्ये तुम्हाला एक उबदार पणा देते. तसेच लोहरी मधली एक रेसिपी म्हणजे दही भल्ला. दही भल्ला मध्ये दही, चिंचेची चटणी, सुका मेवा, उडदाची डाळ आणि इतर भारतीय मसाले यांचा समावेश होतो.

लोहरी भोजन थाळी

ABOUT THE AUTHOR

...view details