वाराणसी :अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्ञानवापी परिसरात पुरातत्व विभागाकडून सर्वे सुरू करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सहाय्यक संचालक आलोक कुमार त्रिपाठी आणि संजय महंती यांच्या नेतृत्त्वात सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकात 61 जणांचा समावेश आहे. यात 33 जण भारतीय पुरातत्व विभागातील आहेत. तर 16 जण हिंदू आणि मुस्लीम पक्षातील आहेत. आज सकाळी 9 वाजता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
दोन्ही पक्षातील लोक उपस्थित : एएसआयच्या पथकाने आज अनेक प्रकारची केमिकल आपल्यासोबत आणली आहेत. काही विशिष्ट प्रकारचे कागदही एएसआयने आणले आहेत. शुक्रवारी ज्ञानवापी परिसरात मॅपिंग, ग्राफिक आणि रडार मशीन बसवण्याचे काम करण्यात आले होते. आज सर्वेक्षणाचे काम चालू होण्याआधीच हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन आणि मुस्लीम पक्षाचे वकील मोहम्मद मुमताज हे ज्ञानवापी येथे दाखल झाले. मुस्लीम पक्षातील लोकही आज दुसऱ्या दिवशी सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
काय म्हणाले हिंदू पक्षाचे वकील : शुक्रवारी हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन हे सर्वेक्षणात सहभागी झाले नव्हते. आज सर्वेक्षणाच्या ठिकाणी जैन दाखल झाले असून त्यांनी सांगितले की,सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. हे काम शास्त्रीय पद्धतीने केले जात आहे. पहिल्या दिवशी मॅपिंग आणि इमेजिंगचे काम केले गेले. तसेच साफ-सफाई केली गेली. जीपीआरच्या पद्धतीने सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे.
काल असे झाले काम : मिळालेल्या माहितीनुसार, जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर करुन एएसआयचे पथक मशिदीची जमीन आणि कलाकृतींची तपासणी करणार आहे. एएसआयच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संशोधनाचे कार्य केले. काल शुक्रवार असल्याने साडेबारा वाजेपासून ते अडीच वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले. नमाज पठणाचा वेळ असल्याने सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा तीन वाजता सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर फिर्यादी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सर्वेक्षणाच्या कामामुळे खूप आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवार असल्याने मशिदीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी आतील चावी आणि तळघराची चावी मुस्लीम पक्षाने दिली नव्हती. यासंदर्भात मस्जिद समितीचे संयुक्त सचिव मोहम्मद यासीन म्हणाले की, त्यांच्याकडे चावीही मागितली गेली नव्हती. तरीही त्यांनी मदत केली आहे. आता काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समितीच्या लोकांनीही मदत करण्याचे मान्य केले आहे. आज मात्र तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षाने नकार दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्ञानवीपीच्या तळघरात नेमकं काय रहस्य दडलंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षा व्यवस्था वाढवली : सर्वेक्षणाच्या ठिकाणी असलेल्या एका सूत्रानुसार, एएसआयच्या पथकाने कार्बन कागदावर कलाकृतींच्या आकृत्या उतरवल्या. शुक्रवारी टोपोग्राफीच्या माध्यमातूनही तपास केला गेला. आज हा तपास पुढे नेला जाणार आहे. ग्लोबल पेनिट्रेटिंग रडार म्हणजेच जीपीआरच्या तंत्राचा उपयोग केला जाणार आहे. स्ट्रक्चरचा तपासही केला जाणार आहे. दरम्यान आज फक्त 45 जणांना सर्वेक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. ज्ञानवापीचा मुद्दा संवदेनशील असल्याने वाराणसीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्ञानवापी परिसर आणि विश्वनाथ मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा-
- Gyanvapi ASI Survey: ज्ञानवापीत पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षणाला सुरुवात, अनेक पुरावे हाती येण्याची शक्यता
- Gyanvapi Masjid Case : उत्खनन न करता ज्ञानवापीचे सर्वेक्षण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश