गुवाहाटी (आसाम) Guwahati Crime News :गुवाहाटी शहर ईशान्य भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांत या शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. शहरात खून, दरोडा, लूटमार आणि मादक पदार्थांच्या सेवनाच्या घटना रोजच घडत आहेत. शनिवारी गुवाहाटीतील नूनमती गणेश मंदिर रोड येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली.
अपार्टमेंटमध्ये मारहाण करून हत्या केली : येथे एका तरुणानं आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह दुचाकीवर ओढून नेला. गुवाहाटीतील नूनमती गणेश मंदिर रोडवर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. झालं असं की, बामुनीमोइदान रेल्वे कॉलनीत राहणारा पीडित रोहित दोरजी हा त्याचा मित्र शुभ्रजित बोरा याच्या विजया ज्योती अपार्टमेंट येथील घरी गेला होता. दरम्यान, मित्रांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर शुभ्रजितनं रोहितला अपार्टमेंटमध्येच मारहाण करून त्याची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो रोहितचा मृतदेह स्कूटीवर घेऊन जाताना दिसत आहे. शेजाऱ्यांनी याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली.
मृतदेह रस्त्यावर फेकून दिला : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रजित आपल्या स्कूटीवर मृतदेह घेऊन जात होता. तो मृतदेह त्याला कुठेतरी फेकायचा होता. परंतु जेव्हा परिसरातील लोकांनी त्याला पाहिलं, तेव्हा त्यानं मृतदेह रस्त्यावर फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रोहितच्या वडिलांनी नूनमती पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
आरोपी फरार : पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, आरोपी शुभ्रजित अद्याप फरार आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनावरून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी तपासाच्या दृष्टीनं अधिक माहिती देण्याचं टाळलं.
हेही वाचा :
- Satara Double Murder : दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरलं! शेतात पाणी द्यायला गेलेल्या दाम्पत्याची निर्घृण हत्या
- Mumbai Crime : मुंबईत 29 वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, दोन आरोपींना वाराणसीतून अटक
- Sexual Assault With Dog : धक्कादायक! सिक्युरिटी केबिनमध्ये सुरक्षा रक्षकाचाच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार