महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gurmeet Ram Rahim: राम रहीमने लावला टी20 क्रिकेटचा शोध?, व्हिडिओद्वारे केला अजब दावा

पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) बागपत आश्रमातून यूट्यूबवर लाइव्ह प्रवचन करतो आहे. (Baghpat dera sachha sauda Ashram). (Ram Rahim on YouTube). अशाच एका व्हिडिओमध्ये राम रहीमने टी-10 आणि टी-20 फॉरमॅटचा शोध लावल्याचा दावा केला आहे. (Ram Rahim claim to invent T20)

Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahim

By

Published : Nov 21, 2022, 5:24 PM IST

बागपत (उत्तर प्रदेश) - पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या भक्तांची भेट घेत आहे. (Ram Rahim on YouTube). सरकारकडून 40 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानंतर गुरमीत राम रहीम सध्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहतो आहे.

गुरमीत राम रहीम

व्हिडिओद्वारे अजब दावे - डेरा सच्चा सौदाच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये राम रहीम टी-10 आणि टी-20 क्रिकेट सामन्यांबद्दल प्रवचन देत आहे. या व्हिडिओमध्ये राम रहीमने दावा केला आहे की, त्याने सिरसामध्ये टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात केली आहे. (Ram Rahim claim to invent T20). तसेच, त्याने एका षटकारापेक्षा मोठा शॉट शोधला आहे ज्या शॉटला 'अठ्ठा' असे नाव देण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये राम रहीम म्हणाला की सिरसा या पवित्र भूमीबद्दल मला खूप आदर आहे, कारण हे त्याचे आजोबा रहबर यांचे जन्मस्थान आहे. व्हिडिओमध्ये राम रहीमने दावा केला आहे की, त्याने पहिल्यांदा सिरसा येथून शॉर्ट फॉरमॅट टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात केली. त्यावेळी जगातील क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या या फॉरमॅटची माहिती नव्हती, असा त्याचा दावा आहे. व्हिडिओमध्ये याचे स्पष्टीकरण देताना राम रहीम म्हणाला की, त्याच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये अठ्ठा हा शॉटही असायचा. स्टेडियमच्या बाहेर गेलेल्या चेंडूला अठ्ठा असे म्हटल्या जायचे.

40 दिवसांचा पॅरोल - राम रहीमचा हा आश्रम बिनोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्नावा गावच्या जंगलात बांधला आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला ऑक्टोबर महिन्यात 40 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी गुरमीत राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमचा 40 दिवसांचा पॅरोल 25 नोव्हेंबरला संपत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details