महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 29, 2023, 10:35 AM IST

ETV Bharat / bharat

Paper Leak : परीक्षेआधीच गुजरात कनिष्ठ लिपिक पेपर लीक, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

आज होणाऱ्या गुजरात कनिष्ठ लिपिक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या पाच तास आधीच पेपर फुटल्याने ही परिक्षा आता रद्द झाली आहे. हैदराबादमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून या परिक्षेचे पेपर फुटल्याची माहिती मिळाली आहे. पेपरफुटीनंतर राजकोट आणि अहमदाबाद सारख्या शहरांतील बसस्थानकांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Paper Leak
पेपर लीक

गांधीनगर : गुजरातमध्ये रविवार 29 जानेवारी रोजी होणारी कनिष्ठ लिपिक परीक्षा 2018 रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या पाच तास आधीच पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून 10 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. याशिवाय गुजरात एटीएसची टीमही तपासासाठी इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहे.

10 हून अधिक जणांना अटक : गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाची कनिष्ठ लिपिकासाठी परीक्षा 29 जानेवारीला आज सकाळी 11:00 ते दुपारी 12 या वेळेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार होती. मात्र सकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून आजच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची प्रत जप्त करण्यात आली. त्यानंतर ही संपूर्ण परिक्षा रद्द करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 10 हून अधिक जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

हैदराबाद कनेक्शन : गुजरातमधील या परिक्षेचे पेपर हैदराबादमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून फुटल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पुढील तपास तत्काळ सुरू करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली आहे, त्याच्याकडून अद्याप पेपर कसे लीक झाले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. हे संपूर्ण नेटवर्क गुजरातबाहेरून चालवले जात असावे, असा पोलिसांना संशय आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व्यवस्था : ही परीक्षा गीर सोमनाथ जिल्हा वगळता गुजरातच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केली होती. ही परिक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आले होते. आता हे विद्यार्थी कॉल लेटर किंवा हॉल तिकीट आणि इफेक्ट फोटो दाखवून गुजरात एसटी बसमध्ये परतीचा मोफत प्रवास करू शकतात. आमदार धवलसिंग झाला यांनी पेपरफूटीत सहभागी असलेल्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी सरकारला विनंती केली आहे.

9 लाख उमेदवार : पेपरफुटीबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कनिष्ठ लिपिकाच्या 1181 जागांसाठी 9 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे. राजकोट आणि अहमदाबाद सारख्या शहरांतील बसस्थानकांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.

विरोधी पक्षनेते अमित चावडा : पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सरकार वर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले, 'भाजप सरकारने पुन्हा एकदा तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचे पाप केले आहे. गेल्या काही वर्षांपासून पेपर फोडण्याची परंपरा आहे. परीक्षेचे पेपर 20 पेक्षा जास्त वेळा लीक झाले आहेत. आपली माणसे सरकारी खात्यात टाकण्याचे षडयंत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांच्याकडे पैसा आणि संसाधने आहेत त्यांनाच गुजरातमध्ये नोकरी मिळू शकते. गुजरातमध्ये सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील एकाही तरुणाला नोकरी मिळू शकत नाही. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांना तुरुंगात टाकावे. तसेच जबाबदार मंत्र्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे'.

हेही वाचा :Kuno Cheetah Update : पंतप्रधान मोदींनी नामकरण केलेली चित्ता 'आशा' गर्भवती? दोन महिन्यांनंतर होणार पुष्टी

ABOUT THE AUTHOR

...view details