महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vintage bikes in India :   शेतकऱ्याकडे आहेत दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या दुचाकी, पहा अप्रतिम संग्रह - Gujarat vintage bikes news

गुजरातमधील एका शेतकरी कुटुंबाकडे ४५ जुन्या दुचाकी (विंटेज बाइक्स) आहेत. विशेष बाब म्हणजे या कुटुंबाकडे १२३ वर्षे जुन्या दुचाकींचा संग्रह आहे. यामधील तीन दुचाकी ब्रिटीशांनी दुसऱ्या महायुद्धात वापरल्या आहेत.

Vintage bikes in India
Vintage bikes in India

By

Published : Jun 7, 2023, 9:36 AM IST

Updated : Jun 7, 2023, 9:48 AM IST

ब्रिटिशकाळाच्या आठवण करून देणाऱ्या दुचाकी

सुरत: रॉयल एनफिल्ड बाईकचे केवळ भारतात नाहीत तर जगातही चाहते आहेत. यामध्ये शेतकरी बंधूदेखील रॉयल एन्फिल्डच्या प्रेमात मागे नाहीत. मात्र, सुरतमधील शेतकरी असलेल्या देसाई कुटुंबाकडील रॉयल एनफिल्ड वेगळीच आहे. ही दुचाकी लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. ही दुचाकी असूनही पेडलनेही चालते. अशा अनेक दुचाकी देसाई कुटुंबाकडे आहेत. विशेष म्हणजे या दुचाकी चांगल्या स्थितीत आहेत.

सिद्धार्थ देसाईंचे वडील कृपलानी देसाई यांना दुचाकीची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाचे हळूहळू पॅशनमध्ये रुपांतर झाले. त्यांच्या वडिलांना दुचाकीची खूप आवड होती. विशेषतः ते जुन्या दुचाकी खरेदी करायचे. त्यांनी जमा केलेल्या दुचाकीचीही काळजी घ्यायची. सध्या दुचाकीची काळजी घेण्यासाठी खास मेकॅनिकची नेमणूक करण्यात आली आहे.

सर्व दुचाकींची महिन्यातून चार ते पाच वेळा सर्व्हिसिंग केली जाते. दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या तीन दुचाकी आहेत. या दुचाकीमध्ये बीएसए, ट्रायम्फ आणि नॉर्टन कंपनीच्या दुचाकीचा समावेश आहे. या तिन्ही दुचाकींची आम्ही काळजी घेत आहोत. महायुद्धात वापरल्या गेलेल्या दुचाकी ब्रिटीशांनी भारतात आणल्या होत्या. पोलिसांनी या दुचाकी भारतात वापरल्या आहेत-सिद्धार्थ देसाई

भंगारात पडलेल्या दुचाकी विकत घेतल्या:विदेशातून आणलेल्या दुचाकीची नोंदणी भारतातच करण्यात आली होती. सध्या त्यांच्याकडे BMW, Ariel, Lambretta, Yezdi आणि Jawa यासह अनेक कंपन्यांच्या विंटेज बाइक आहेत. या बाइक्स बहुतेक ब्रिटिश आणि जर्मन कंपन्यांनी उत्पादित केल्या आहेत. सिद्धार्थ यांने सांगितले की, अनेक बाईक त्याच्या वडिलांनी दुप्पट किंमत देऊन विकत घेतल्या आहेत. वडिलांनी भंगारात पडलेल्या दुचाकी लोकांकडून विकत घेतल्या होत्या.

दुचाकींच्या विक्रीत वाढ:रॉयल एनफील्ड ही आयरिश कंपनी आहे. या दुचाकीची किंमत सध्या एक लाख 80 हजार रुपयांपासून पुढे आहे. रॉयल एनफिल्डच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. मे 2023 मध्ये 77,461 दुचाकींची विक्री झाली आहे. ही विक्रीतील वार्षिक वाढ 22 टक्के आहे. रॉयल एनफिल्ड बाईकच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जावा 42, होंडा हॅन्स सीबी 350, यामाहा आर15 व्ही4 या दुचाकींचा समावेश आहे.

Last Updated : Jun 7, 2023, 9:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details