नवी दिल्ली -आज गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 81 महानगरपालिका, 31 जिल्हा पंचायती आणि 231 तालुका पंचायतीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली. 23 महानगरपालिका आणि 3 तालुका पंचायतीसाठी पोट निवडणुका होत आहे.
गुजरात निवडणूक : 36 हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान जारी - गुजरात निवडणूक लेटेस्ट न्यूज
गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी 81 महानगरपालिका, 31 जिल्हा पंचायती आणि 231 तालुका पंचायतीसाठी मतदान सुरू आहे. आप, बसपा आणि अन्य राजकीय पक्षही रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आहे.
2 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक मतदार मतदान करणार असून, महापालिकेच्या 2729 जागांपैकी 95 ठिकाणी बिनविरोध झाल्याने आता 2625 जागांवर मतदान होणार आहे. जिल्हा पंचायतीच्या 955 जागा आणि तालुका पंचायतींच्या 4655 जागांसाठी मतदान होणार आहे.
आप, बसपा आणि अन्य राजकीय पक्षही रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आहे. मंगळवारी मतमोजणी होणार आहे. गेल्या 23 फेब्रुवारीला लागलेल्या निकालात सुरत महानगपालिकेत भाजपाने 120 पैकी 90 जागा जिंकत सत्ता राखली. मात्र, उर्वरित 27 जागा आपने जिंकल्या. काँग्रेसला येथे एकही जागा जिंकता आली नाही.